flash_area
   
Quick Links
 
Staff Contact Details
PGIVAS in News
Departments
Achievements
Farm
Research
Training Program
Photo Gallery
 
PGIVAS, AKOLA BACK   >>

स्नातकोत्तर पशुवैद्यक व पशुविज्ञान संस्था अकोला येथे आंतरमहाविद्यालयीन सांस्कृतिक स्पर्धांचे आयोजन

महाराष्ट्र पशु व मत्स्य विज्ञान विद्यापीठ नागपूर अंतर्गत असलेल्या पशुवैद्यकीय, दुग्ध तंत्रज्ञान आणि मत्स्य विज्ञान शाखेच्या एकूण १० घटक महाविद्यालयांच्या विद्यार्थ्यांच्या सांस्कृतिक स्पर्धा "इंद्रधनुष्य २०१९" नुकत्याच स्नातकोत्तर पशुवैद्यक व पशुविज्ञान संस्था अकोला येथे दिनांक १० व ११ ऑक्टोबर २०१९ दरम्यान आयोजित करण्यात आल्या होत्या. यात संगीत, नृत्य, साहित्य, रंगभूमी, ललित कला अशा एकूण २६ विविध स्पर्धांमध्ये सुमारे २०० पेक्षा अधिक विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदविला होता. स्नातकोत्तर पशुवैद्यकीय महाविद्यालयाच्या सभागृहात तसेच डॉ.पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाच्या प्रा. श्रावण वंजारी सभागृहात शास्त्रीय संगीत गायन व वादन, लोकनृत्य, एकांकिका, मूकनाट्य, वक्तृत्व, वादविवाद, प्रश्नमंजुषा अशा अनेक कलाप्रकारात विद्यार्थ्यांनी आपले नैपुण्य प्रदर्शित केले. सर्व कलाप्रकारामध्ये विविध तज्ञ परीक्षकांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले. याप्रसंगी डॉ. प्रवीण बनकर, आयोजक सचिव यांनी ज्येष्ठ रंगकर्मी प्रा. मधू जाधव, अनिल कुलकर्णी, डॉ. भोकरे, अमृता जटाळे, तृप्ती बोनते, डॉ. निशा वराडे, डॉ. प्राची हलगावकर, ऍड.धूत, संजय आगाशे, नीरज भांगे या परीक्षकांचे विशेष आभार मानले.

विद्यापीठ चमू निवड चाचणीच्या या कार्यक्रमाचे आयोजक डॉ. विलास आहेर, सहयोगी अधिष्ठाता यांनी उपस्थित विद्यार्थ्यांच्या अंगभूत कलाविष्काराचे कौतुक केले आणि जीवनाच्या विविध पैलूंमध्ये सांस्कृतिक कौशल्यांचा विनियोग उत्कर्षासाठी कसा करावा याबाबत मार्गदर्शन केले. समारोपीय कार्यक्रमात प्रा. शामसुंदर माने, सहयोगी अधिष्ठाता, कृषी महाविद्यालय, अकोला यांची प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थिती लाभली. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी डॉ. श्याम देशमुख, डॉ. मिलिंद थोरात, डॉ. कुलदीप देशपांडे, डॉ. साजिद अली, डॉ. मयुरा गोळे, डॉ. दिलीप बंदूकले, डॉ. गिरीश पंचभाई तसेच प्रा. तोटावार यांनी विशेष परिश्रम घेतले.

 
 
 
 
 
 
Copyright © 2012 PGIVAS, Akola. All rights reserved.